loading...

*संघर्ष हा शब्द केवळ पुस्तकात लिहून संघर्ष होणार नाही; त्यासाठी प्रत्यक्ष लढावे लागते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*दलित पँथर चळवळीच्या  वैचारिक संघर्षाला दिशा देण्याचे काम दिवंगत काशी कृष्णा यांनी केले*

*पँथर चळवळी ने कुणावर अन्याय केला नाही मात्र अन्याय करणाऱ्यांना सोडले नाही*

by Prashant Kapadia/NHN

मुंबई दि  –  संघर्ष हा शब्द केवळ पुस्तकात लिहून संघर्ष होणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष लढावे लागते; त्याग करून ; समर्पित होऊन  चळवळ उभारून प्रत्यक्ष  संघर्ष करावा लागतो . पँथर दिवंगत काशी कृष्णा यांनी आपले आयुष्य आंबेडकरी विचार ;बौद्ध धम्म प्रसारासाठी व्हाहून  घेतले त्याच बरोबर त्यांनी दलित पँथर चळवळी च्या वैचारीक संघर्षाला दिशा देण्याचे काम केले अशा  शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी   दिवंगत पँथर नेते काशी कृष्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

गोरेगाव येथील  केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉल मध्ये दिवंगत पँथर  काशी कृष्णा यांना आदरांजली वाहणाऱ्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ना रामदास आठवले बोलत होते.

या सभेचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेश; आंध्र दलित युवजन संघ; ऑल इंडिया आंबेडकर युव जन संघ; संमत सैनिक दल आंध्र प्रदेश; यानम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी रिपाइं मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे होते.विचार मंचावर पँथर चे संस्थापक सदस्य ज्येष्ठ नेते साहित्यिक ज वी पवार; रमेश शिंदे; आर के गायकवाड ; कमलेश यादव; भदंत शांती रत्न; मूलनिवासी माला;के जे राव; सुबा राजू; रामकृष्ण बट्टी;  जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव; रमेश गायकवाड; प्रकाश जाधव; भीमराव सवातकर;चंद्रशेखर कांबळे; ऍड अशा लांडगे;उषा रामळू; एम एस नंदा; सोना कांबळे; रमेश पाईकराव; रमेश पाळंदे; संजय खंडागळे; सुरेश सोनवणे;आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

दलित पँथर ही आक्रमक समघर्षशील चळवळ होती.आंबेडकरी चळवळ वैचारिक संघर्ष मानते.आंबेडकरी चळवळीत हिंसेला स्थान नाही.आंबेडकरी विचारधारा नक्षलवादाला ; आतंकवादाला  विरोध करणारी विचारधारा आहे.  स्वतःहून कुणावर अन्याय करायचा नाही मात्र कोणी अन्याय केला तर त्याला सोडायचे नाही. आपल्याविरुद्ध  बोट दाखवील ते बोट तोडुन टाकण्याची हिम्मत पँथर च्या चळवळीत होती.असे ना.रामदास आठवले म्हणाले.

दिवंगत काशी कृष्णा हे मूळचे आंध्र प्रदेश च्या विशाखा पट्टानम चे होते.ते मुंबईत आल्यावर गोरेगाव मध्ये राहिले.दलित पँथर मध्ये ते सहभागी झाले.त्यांचे व्यक्तिमत्व वैचारिक होते.त्यांनी संपूर्ण जीवन आंबेडकरी चळवळीला वाहिले.आपल्या दलित समाजाच्या उद्धारा साठी ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन  ते बौद्ध  झाले होते. त्यांनी बौद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळीसाठी जगभर प्रवास केला. मी दुबई जेंव्हा जेंव्हा कार्यक्रमासाठी गेलो तेंव्हा तेंव्हा तिथे मला काशी कृष्णा भेटत असत. त्यांच्याशी  माझे अत्यंत जवळचे संबंध होते.दलित पँथर पासून काशी कृष्णा यांनी मला साथ दिली.त्यांच्या सारख्या पँथर कार्यकर्त्यांच्या योगदानातून माझे नेतृत्व घडत गेले.पँथर ते केंद्रीय मंत्री पदाच्या माझ्या प्रवासात पँथर चळवळीतील कार्यकर्त्यांचे योगदान आहे. दिवंगत काशी कृष्णा यांनी दलित पँथर मजबूत करण्याचे काम केले अशा शब्दांत ना रामदास आठवले यांनी दिवंगत काशी कृष्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोठ्या संख्येने रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *